Talegaon crime : ज्ञान सरस्वती प्रोड्यूसर कंपनीच्या MPO आणि संचालकावर गुन्हा दाखल करण्याची पदाधिकारी व सभासदांची मागणी

एमपीसी न्यूज : एमएलसी अंतर्गत ज्ञानसरस्वती प्रोड्यूसर कंपनीच्या तीन संचालका विरोधात कंपनीच्या व्यवहारात अफरातफरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.(Talegaon crime) ही मागणी कंपनीचेच पदाधिकारी व सभासंदानी केली आहे. यासाठी तळेगाव पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देखील देण्यात आला आहे.

अर्जामध्ये नुमूद केल्या नुसार कंपनीचे संचालक श्रीकांत कंधारे व त्यांच्या पत्नी संगीता अंधारे MPO व मुलगी प्राजक्ता कंधारे तसेच सचिन केदारी यांनी मिळून कंपनीच्या व्यवहारात तब्बल 10 लाख 38 हजार 500 रुपयांचा हिशोब न देता त्याबद्दल विचारणा करणाऱ्यांना उलट उत्तरे व अपमानास्पद वागणूक दिली आहे.

तक्रार अर्जात म्हटल्यानुसार 10 फेब्रुवारी 2021 साली ज्ञान सरस्वती प्रोड्यूसर कंपनी ची स्थापना केली. कंपनीच्या वाढीसाठी पुढे कंपनीला नवीन संचालक व चॅनल पार्टनर ही जोडले गेले. सुरुवातीला कंधारे दाम्पत्याने सर्वांना विश्वासात घेऊन काम केले.(Talegaon crime) मात्र पुढे जसे सभासद वाढत गेले तसे कंपनीच्या आर्थिक व्यवहारात मनमानी काराभार सुरु केला. मिटींगमध्ये ठरावांची पूर्तता न करता वेळकाढूपणा केला. चॅनल पार्टनर,सभासद यांच्याशी कोणतीच चर्चा न करता परस्पर कंपनीचे काही करार केले.

Ganpati decoration Competition : घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा -2022 बक्षीस वितरण सोहळा संपन्न

तसेच कंधारे यांनी जाणीवपूर्वक कंपनीचे अधिकार हे कुटुंबातील सदस्याकडे ठेवले.यामुळे व्यवहाराबाबत विचारणा केली असता उलट उत्तरे किंवा अपमानास्पद वागणूक विचारणाऱ्याला दिली गेली. तसेच 7 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या संचालक मंडाळाच्या बैठकीत कंधारे यांनी जो कंपनीच्या आर्थिक व्यवहाराचा अहवाल सादर केला त्यात तब्बल 10 लाख 38 हजार 500 रुपयांची तफावत दिसत होती.(Talegaon crime) याबबत विचारणा केली असता त्यांनी केवळ पैस खर्च केले असे उत्तर दिले. ते कोठे, कधी कोणाच्या परवानगीने खर्च केले याचे अद्याप उत्तर किंवा अहवाल त्यांनी दिलेला नाही. विचारणा करणाऱ्याला ते दबावतंत्रांचा वापर करून शांत करतात.

कंपनीचे सध्या 14 हजार पेक्षा जास्त सभासद आहेत. त्यात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे संचालक हे सभासंदाचीही फसवणूक करत आहेत. तसेच सभासदांना इन्सेंटीव्ह दिलेला नाही, वचनांची पुर्तात करण्यात आलेली नाही,पूर्णवेळ काम करूनही काही जणांना पगार न देता कामावरून काढून टाकले, काहीं जणांकडून उसने पैसे घेऊन ते परत दिले नाहीत, काहींना तर सभासद नोंदणीचे उद्दीष्ठ पूर्ण होताच संचालक पदावरून काढून टाकल्याचे पत्र पाठवले,कामगार पुरवणाऱ्यांना पैसे दिले नाहीत उलट तुमच्या घरात येवून आत्महत्या करेन अशी धमकी दिली, जमीन भाड्याने घेतली तर त्याचा ठरल्याप्रमाणे मोबदला दिला (Talegaon crime) नाही अशा अनेक तक्रारी संचालाका विरोधात आहेत. याबाबत विचारणा केली असता ते उलट उत्तरे देतात व बदनामी करतात म्हणून तळेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी कंपनीचे सभासद व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.