Mahatma Gandhi Jayanti : निगडी परिसरात गांधी जयंतीनिमीत्त रॅलीद्वारे व्यसनमुक्ती बाबत जनजागृती

एमपीसी न्यूजव्यसनाच्या आहारी जाणाऱ्या तरुणीपिढीमध्ये व त्यांच्या पालकामध्ये जनजागृती व्हावी, त्यांनी व्यसनापासून दूर जाव यासाठी निगडी सेक्टर 22 व ओटास्कीम परिसरात गांधी जयंती निमीत्त रविवारी (दि.2) एक जनजागृती रॅली काढण्यात आली होती. ही रॅली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, विमल फाऊंडेशन व आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली होती.

सकाळी निगडी सेक्टर 22 येथील पोलीस चौकी पासून या रॅली सुरु करण्यात आली ती पुढे ओटास्कीम परिसरात फोरी मारून पुन्हा सेक्टर 22 येथील पोलीस चौकी जवळ येत रॅलीची सांगता झाली. यावेळी डॉ. काशीनाथ बामणे, समा सय्यद,वंदना वाघमारे, आकाश शिंदे, बी.आर.माडगूळकर व मातोश्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.

Red Zone Nigdi : रेड झोन बाधित क्षेत्रातील लोकांचा संभ्रम जिल्हाधिकाऱ्यांनी दूर करावा – सतिष मरळ

या रॅलीद्वारे नागरिकांना व्यसन सोडा आनंदी रहा, व्यसनाला नाही म्हणा, एक गोष्ट पक्की आहे व्यसनमुक्ती शक् आहे अशा घोषणा देत व फलक हातात घेऊन अनेकजन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.यावेळी गांधी जयंती निमीत्त काढण्यात आलेल्या या रॅलीचे नागरिकांनीही कौतुक करत समर्थन दर्शविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.