Pune : आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा चरणी 33 किलोच्या मोदकाचा प्रसाद अर्पण 

एमपीसी न्यूज- ठाकरे गटाचे युवा सेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे ( Pune ) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश याग करण्यात आला.यावेळी उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते 33 किलोच्या मोदकाचा प्रसाद गणपती बाप्पास अर्पण करण्यात आला.यावेळी शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवराज पारीख,अजिंक्य धात्रक,राम थरकुडे,आनंद भिलारे, प्रतिक दगडे, सुशांत पोकळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 Shirur : शिरूर लोकसभा मतदार संघात आमदार महेश लांडगेंची वज्रमूठ

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री असताना. सर्व सामान्य नागरिकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरणाच्या दृष्टीने जे काही संकल्प आणि उपक्रम आहेत.त्या सर्वांना गणपती बाप्पाने यश देवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी ( Pune ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.