Pimpri : अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम

पालिका करणार 500 झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी (Pimpri) चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे तसेच पर्यावरणपूरक शहरासाठी 500 झाडांचे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

Pune : लॉयला हायस्कूल आणि बिशप्स स्कूलमध्ये फायनल

1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधी दरम्यान निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, परिसंवाद, किर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांची प्रमुख उपस्थिती असेल.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचार प्रबोधनपर्वानिमित्त आयोजित पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वात विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यामध्ये 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात सकाळी पारंपरिक सनई वादनाने करण्यात येणार आहे. विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता विविध हलगी पथकाद्वारे “हलगी वादनाची जुगलबंदी” सादर केली जाणार आहे.

सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांचा “स्वरचंदन” हा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी साडे बारा वाजता वेदांग महाजन हे “जागर ,महापुरुषांच्या विचारांचा” हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.

दुपारी दोन वाजता विविध बँड पथकांमध्ये “बँड स्पर्धा” रंगणार आहे. दुपारी चार वाजता अनिकेत जवळेकर यांचा “सुवर्ण लहरी” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी पाच वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सायंकाळी सहा वाजता साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा “लोकशाहीर आणा भाऊ साठे व आद्यक्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या जीवनावर आधारित समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बापूराव पवार यांचा “लेखणीचा बादशहा” हा प्रबोधनपार गीतांचा कार्यक्रम होणार असून रात्री आठ वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता कुणाल कांबळे यांच्या ‘अण्णा तुमच्यासाठी’ हा प्रबोधनात्मक गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने होणार आहे.

 

2 ऑगस्ट रोजी विचार प्रबोधन पर्वाच्या दुस-या दिवशी सकाळी 9 वाजता सुजित रणदिवे यांचा “सनई आणि सुंदरी यांची जुगलबंदी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता पल्लवी घोले व अमर शेख यांचा “अण्णांची गौरव गाथा तसेच शाहीरी जलसा” हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गीत गायनाचा कार्यक्रम राहूल शिंदे, विजय सरतापे व शामल धिमधिमे हे सादर करणार आहेत.

त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक वाजता इंडियन आयडॉल फेम, अमोल सकट व ज्योती अवघडे यांचा प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी अडीच वाजता वर्षा पवार यांचा मराठी लोकगीते, प्रबोधनात्मक गीते हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील मानवतावादी वैचारिक दृष्टीकोन या विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिसंवादामध्ये विवेकवादी विचारवंत, अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, संपादक – साप्ताहिक विवेक, मुंबई रविंद्र गोळे, प्रा.डॉ. मिलिंद आव्हाड, जेएनयु, डॉ. धनंजय भिसे, कामगार आयुक्त, पुणे, सतिश देशमुख, प्रा. प्रदिप कदम, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार हनुमंत पाटील, अशोक पालके हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी 5.40 वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रवादाची प्रेरणा या विषयावर ज्येष्ठ विचारवंत, डॉ. रमेश पांडव यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सायंकाळी 6 वाजता कोमल पाटोळे प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. रात्री 8 वाजतागणेश गायकवाड यांच्या “सांस्कृतिक कार्यक्रमाने” प्रबोधन पर्वाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

3 ऑगस्ट रोजी सकाळी साडे आठ वाजता किर्तनकार – ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर “प्रबोधनात्मक किर्तन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10 वाजता शांताबाई फेम, संजय लोंढे व प्रभू जाचक यांचा “प्रबोधनात्मक गीते” –हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी साडे अकरा वाजाता न्यू होम मिनिस्टर फेम, रमेश परुळेकर यांचा खेळ रंगला पैठणीचा तीन प्रमुख बक्षीस समाविष्ट असा विशेष महिलांकरिता कार्यक्रम होणार आहे.

त्याचबरोबर सिने अभिनेत्री गुरुमित कौर यांचे “महिला मार्गदर्शनपर व्याख्यान” आयोजित करण्यात आले आहे. दुपारी एक वाजता अक्षय डाडर व लखन अडागळे हे “सांस्कृतिक कार्यक्रम” सादर करणार आहेत. दुपारी अडीच वाजता छाया मोरे आणि पार्टी यांचा प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी चार वाजता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि वंचित समाज विषयावर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिसंवादामध्ये शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र, पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेजचे डॉ. आनंद काठीकर, वाडिया कॉलेजच्या डॉ. वृषाली रणधीर, डॉ. बबन जोगदंड, यशदा, पुणे व संदिपान झोंबाडे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सायं. साडे पाच वाजता संगीतमय रामलिंग जाधव यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी सात वाजता वर्षा रायकर यांचा पारंपरिक लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता राजू जाधव व रविंद्र खोमणे यांचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने विचार प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता होणार आहे.

4 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात सकाळी साडे नऊ वाजता कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता सारिका नगरकर यांचा “प्रबोधनपर लोकगीतांचा कार्यक्रम” होणार आहे.

त्यांनतर सकाळी साडे बारा वाजता भिम ज्योती परिवर्तन सांकृतिक मंडळ, बीड, छाया कोकाटे या “वंदन करू आण्णा भाऊंना” गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारच्या सत्रात दोन वाजता मयूर खुडे “ही चंद्राची चांदणी” हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी. साडे तीन वाजता शामसन चंदनशिवे व राजु डेव्हिड यांचा “गौरव आण्णाचा” सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी पाच वाजत्ता उद्योजकता कार्यशाळा अंतर्गत विविध मान्यवरांसमवेत संवाद विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये पुण्याचे समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मंडळचे अनिल म्हस्के, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे, जिल्हा व्यवस्थापक, खादी ग्राम उद्योग, महापालिकेचे समाज विकास अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी सात वाजता सुरेश पंचरास यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार असून रात्री साडे आठ वाजता विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवसाची सांगता सिने कलाकार राधिका पाटील आणि सहकारी यांच्या “लोकगीताच्या कार्यक्रमाने” होणार आहे.

5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता किसन गायकवाड व विजय साळवे यांचा “पारंपरिक वाद्यवादन” कार्यक्रम व उत्तम बिरगणे, शिराळा, कोल्हापूर यांचा “हलगी वादन” कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता डॉ. सचिन परब यांचे “व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन” व्याख्यान असणार आहे.

सकाळी साडे दहा वाजता शाहीर काशिनाथ उबाळे व मोहम्मद शेख यांचा लोकगीतांचा कार्यक्रम” होणार आहे. सकाळी. साडे अकरा वाजता सुरेश रंजवे यांचा “प्रबोधनपर गीते” कार्यक्रम होणार आहे. दुपारी एक वाजता सोनाली संजय फलफले यांचा स्वराधीन -रंगमंच मराठी कलेचा,कार्यक्रम होणार आहे.

 

दुपारी अडीच वाजता पोतराज ते डॉक्टर डॉ. धर्मराज साठे यांची विशेष मुलाखत मुलाखतकार शिवाजी घोडे, पत्रकार हे हे घेणार आहे. सायंकाळी ३ वाजता अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाचे फायदे व तोटे ? विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये लोकमत वृत्तपत्राचे राज्य संपादक संजय आवटे, केशव शेकापुरकार, डॉ. सुशीलकुमार चिमुरे, भाऊसाहेब अडागळे, मनोज तोरडमल हे मान्यवर सहभागी होणार आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजता निलेश देवकुळे यांचा “प्रबोधनपर गीतांचा” कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता स्वाती पुणेकर यांचा “लोकगीतांचा भव्य कार्यक्रम” कार्यक्रम होणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व 2023 या 5 दिवसीय कार्यक्रमाची सांगता रात्री साडे आठ वाजता सिने कलाकार प्राजक्ता महामुनी आणि दिप्ती आहेर यांच्या लोकगीताचा भव्य कार्यक्रमाने होणार आहे.

महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार असून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व निमित्त 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे तसेच माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमास सहकार्य असणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाबरोबरच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी स्त्री-रोग तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभाग तसेच लाईट हाऊस च्या सहकार्याने महिलांना उद्योजकता प्रशिक्षण व रोजगारासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना उच्च तसेच परदेशी शिक्षणाच्या संधी, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना अशा विविध योजनांवर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.