Sangvi : गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी ममतानगर येथील बालयोगी आश्रमाजवळ केली.

उमेश सुरेश पवार (वय 29, रा. निगडे गिरणी शेजारी, डायमंड चौक, यशवंतनगर, येरवडा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममतानगर मधील बालयोगी आश्रमाजवळ एक इसम संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असल्याचे आढळले. गावठी कट्टा आणि काडतूस जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक केली. उमेश याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1), भारतीय दंड विधान कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही करावी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस फौजदार भालेराव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर माडीवाले, पोलीस नाईक बो-हाडे, भोजणे, भिसे, दांगडे, गारडे, देवकांत, पोलीस शिपाई नरळे, पिसे, खोपकर, चांदेकर, गुत्तीकोंडा, देवकर, फल्ले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.