Wakad : अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणावर गुन्हा दाखल केल्याने त्याचा खर्च झाला. तो खर्च देण्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे न दिल्यास घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

रवींद्र बापू जगताप (वय 21, रा. मालवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. देवेंद्र अनिल गुप्ता (वय 31, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवेंद्र यांनी आरोपी रवींद्र याच्या विरोधात गुन्हा नोंदवला. त्यात रवींद्र याचा खर्च झाला. त्या खर्चापोटी रवींद्र याने देवेंद्र यांना अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यासाठी वारंवार फोन करून त्रास दिला. तसेच पैसे न दिल्यास देवेंद्र, त्यांची पत्नी, आई आणि वडिलांना जीवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिसांनी रवींद्र याला बेड्या ठोकल्या आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.