Bhosari Crime News : तडीपार आदेश भंग केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – तडीपार आदेश भंग केल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात येऊन कोणतीही कायदेशीर पूर्व परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

सुंद्रिगण्या अडागळे (वय 23 वर्षे, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडागळे याला काल (दि. 19 जून) दापोडी येथील सार्वजनिक शौचालयाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे 200 रुपये किंमतीचा कोयता सापडला. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी घातक शस्त्र बाळगण्याचे मनाई केली असून देखील अडागळे याच्याकडे विनापरवाना कोयता आढळून आला. शिवाय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय ने आयुक्तालाय व पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून 24 महिने करिता तडीपार केले असतानाही पिंपरी चिंचवड शहरात येऊन कोणतीही कायदेशीर पूर्वा परवानगी न घेता अडागळे याने तडीपार आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपीविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), महाराष्ट्र पालिस कायदा कलम 37(1) सह 135, 142 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.