Molestation Case : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – महिलेशी जवळीक (Molestation case) साधत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणे महिलेने बंद केले. त्यावरून त्याने महिलेच्या पतीला फोन करून महिलेची बदनामी केली. तसेच धमकी देऊन त्यांच्या दोन वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना सन 2020 पासून 29 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भांबोली येथे घडली.

सुजित स्वाईन (वय 33, रा. वराळे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये लॉकडाऊनमध्ये फिर्यादीच्या ओळखीचा व्यक्ती आरोपी सुजित हा वराळे येथे राहण्यास आला. ओळखीचा असल्याने दोघांचे बोलणे होत असे. मात्र, नंतर आरोपी फिर्यादीशी जवळीक साधण्याचा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे फिर्यादींनी (Molestation case) त्याला बोलणे बंद केले. त्याचा नंबर ब्लॉक केला. मात्र तरीही आरोपी फिर्यादींचा पाठलाग करू लागला. त्याने फिर्यादीच्या पतीला फोन करून धमकी दिली. तसेच फिर्यादींच्या दोन दुचाकींची तोडफोड करून त्यांचे नुकसान केले. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.