Pune Crime News :  पोलीस चौकीतच तरुणीचा धिंगाणा, महिला कर्मचाऱ्याला मारहाण तर पोलिस अधिकाऱ्याशी झटापट

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातून एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस चौकीत आलेल्या एका तरुणीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस अधिकारी सोबतच झटापट करत अश्लील शिवीगाळ केली. या तरुणीवर वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी तरुणी 21 वर्ष वयाची आहे. 26 वर्षीय महिला कर्मचाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारच्या सुमारास तरुणी पुणे कर्वेनगर येथील पोलीस चौकीत गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. फिर्यादी या मार्शल आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर त्या पोलीस चौकीत पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी या तरुणाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तिची तक्रार दाखल करून घेतली आणि त्यानंतर तरुणी परत निघून गेली.

काही वेळानंतर ही तरुणी पुन्हा कर्वेनगर चौकीत गेली. तिने पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. ती गोंधळ घालत असल्याने तक्रारदार महिला कर्मचाऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

तसेच, चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक यांना देखील अपशब्द वापरत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या गणवेशाला धरून ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळानिर्माण केला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक सोनाली कथले या करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.