Talegaon News : कन्स्ट्रक्शन साईटवरील सिक्युरिटी केबिनला आग

एमपीसी न्यूज – कन्स्ट्रक्शन कंपनीतील सिक्युरिटी केबिनला अज्ञातांनी आग लावली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) रात्री सव्वादहा वाजता मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.

रघुवीर रामचंद्र ननावरे (वय 69, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारुंब्रे येथील इव्हीटा कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीतील टेम्पल पॉईंटला असलेल्या सिक्युरिटी केबिनला अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता आग लावली. यात केबिन जळून खाक झाली. पोलीस नाईक जुंदरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.