Chikhali Crime News : यात्रेतून घरी परतताना महिलेचे मिनी गंठण, मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – चिखली गावातील भैरवनाथ देवीच्या यात्रेतून घरी परतत असताना महिलेचे मिनी गंठण, मोबाईल हिसकावला. चिखली चौकाजवळ रविवारी (दि.17) रात्री 7.15 वा ही घटना घडली.

पुनम सचिन ढोरे (वय 38, रा. संतकृपानगर, लक्ष्मीरोड, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या कुटुंबियांसोबत चिखली येथील भैरवनाथ देवीच्या यात्रेत देवीचे दर्शन घेऊन घरी परत येत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या हातातील पर्स ज्यामध्ये दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, मोबाईल, पॅन कार्ड व आधार कार्ड असा 65 हजार रुपयांचा ऐवज होता. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.