Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे बीआरटीएस रोडवर दुचाकींचा अपघात, एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  बीआरटीएस रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात  38 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Pimple Saudagar) हा अपघात शनिवारी (दि.17) रात्री पिंपळे सौदागर येथे घडला.

याप्रकरणी तुकाराम संपत भोंडवे (वय 64 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादी यांचा मुलगा प्रशांत तुकाराम भोंडवे (वय 38) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यावरून 22 वर्षीय दुचाकीस्वार (एमएच 14 जी.एफ.0952) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehu road : दागिन्यासह घरातून सिलेंडर आणि मोटर चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हा देखील दुचाकीवरून जात होता. यावेळी आरोपी दुचाकीस्वार हा बीआरटीएस रोडवरून उलट दिशेने वेगाने येत होता. समोरून आलेल्या दुचाकी अंदाज न आल्याने प्रशांत याच्या दुचाकीची समोरा समोर धडक बसली व प्रशांत याचे अपघाती निधन झाले. (Pimple Saudagar) समोरील तरूणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.