Wakad : लकी मोबाईल नंबर ठरल्याचे भासवून एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – तुमचा मोबाईल नंबर लकी मोबाईल नंबर ठरला असून तुम्ही कार जिंकली आहे. असे अमिष दाखवून इसमाला 1 लाख 5 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र कार न मिळाल्याने इसमाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान घडला.

फिरोज युसुफ खान (वय 42, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कनोज दिलीप व प्रिया (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांना आरोपींनी तुमचा मोबाईल नंबर हा लकी मोबाईल नंबर ठरला असून तुम्ही कार जिंकला आहात. कार मिळविण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि अन्य खर्च या नावाखाली आरोपींनी खान यांच्याकडून वेळोवेळी 1 लाख 5 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. त्यानंतर आरोपींनी खान यांना मिळालेली कार पुणे विमानतळावर पार्क केल्याचे सांगितले. खान पुणे विमानतळावर गेले असता त्यांना कार मिळाली नाही. तसेच आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.