Crime News : रहाटणीत टोळक्याची एकास कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – रहाटणीत आठ जणांच्या टोळक्याने एकास कोयत्याने मारून जखमी करून परिसरात दहशत पसरवण्याची घटना मंगळवारी घडली होती.
याबाबत प्रवीण देवकर, (वय 21 रा.रामनगर रहाटणी मूळ जिल्हा बुलढाणा) यांनी फिर्याद वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. बबलू तलवारे, (वय 20), अजय कांबळे (वय 21), सुनील कांबळे (वय 19), संदीप (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्याच्या सोबत राहणारे 3 ते 4 जण (सर्व रा. रहाटणी) या आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे मंगळवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास महाराष्ट्र टी सेंटर, कोकणे चौक, राहटणी येथे त्यांचे मित्र सुमित शिंदे यांच्यासोबत चहा पिण्यासाठी गेले होते.फिर्यादीचे भाऊ प्रथमेश याचे मित्र वरील 4 आरोपी आले व त्यांनी इतर 3 ते 4 मित्रांना बोलावून घेतले.
फिर्यादीचे भाऊ प्रथमेश यांच्याबरोबर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी बबलू तलवारे, अजय कांबळे व सुनिल कांबळे यांनी त्यांच्याकडील कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यात वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून आरडाओरड करून परिसरात दहशत निर्माण करून तेथून पळून गेले.