Pimpri News : सायकलची धडक बसली म्हणून माफी मागण्यास सांगितल्याने एकास मारहाण

18 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – लहान मुलगी सायकल खेळत असताना तिच्या सायकलची धडक दुस-या मुलीला बसली. त्यामुळे धडक देणा-या मुलीला माफी मागण्यास सांगितल्याने मुलीच्या वडिलांसह आठ जणांनी मिळून एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास बी यु भंडारी सोसायटी, दिघी येथे घडली.

शरद मारुती चव्हाण (वय 35, रा. बी यु भंडारी सोसायटी, दिघी), इतर अनोळखी दहा ते सतरा मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय कुमार शंकरराव सुरवसे (वय 34, रा. बी यु भंडारी सोसायटी, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण याची मुलगी सोसायटीच्या पार्किंग मध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी तिची दुस-या मुलीला धडक बसली. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीच्या मुलीला माफी मागण्यास सांगितले. या कारणावरून सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी यांना लोखंडी फायटर, शूज रॅकने मारहाण केली. एका व्यक्तीने आरोपींच्या तावडीतून फिर्यादी यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्या व्यक्तीला देखील मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक शिखर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.