Facebook fraud : विमानतळावर कस्टम ऑफीसरने पकडल्याचे सांगत फेसबुक फ्रेंडकडून 58 लाख उकळले

एमपीसी न्यूज : भारतात पर्यटनासाठी आलो असून आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डॉलर आहेत. त्यामुळे विमानतळावर पकडले असल्याचे सांगत फेसबुक फ्रेंडकडून तब्बल 58 लाख 78 हजार उकळल्याची घटना बावधन येथील एका नागरिकासोबत घडली आहे.(Facebook fraud) हा प्रकार 22 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत फेसबुक आणि ओनलाईन माध्यमातून घडला.

शाम अरविंद ओझरकर (वय 54 , रा. पाटीलनगर, बावधन) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 25) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. विल्यम अल्बर्ट,  0589200100000661 खातेधारक, 7042136239, 8130318145 या मोबाईल धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Purna nagar power supply : पूर्णा नगर व आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विल्यम याच्या सोबत फिर्यादी ओझरकर यांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. विल्यम याने तो पर्यटनासाठी भारतात आला असून त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक डॉलर आहेत. त्यामुळे त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.(Facebook fraud) त्याला ओझरकर यांच्या मदतीची गरज आहे, असे सांगून त्याने ओझरकर यांची दिशाभूल केली. वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून तब्बल 58 लाख 78 हजार 700 रुपये घेत फसवणूक केली.  याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.