Chinchwad : आठवडे बाजारचे चिंचवडला उदघाटन

एमपीसी न्यूज – ग्राहक व शेतकरी यांना जोडणार्‍या शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन स्थानिक नगरसेवक  शीतल शिंदे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार किफायतशीर किमतीमध्ये ताजा भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य या आठवडे बाजारातून उपलब्ध करण्यात येणार असणार असल्याचे आयोजक व नगरसेवक  शीतल शिंदे यांनी सांगितले. 

आमदार लक्ष्मण जगताप,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक अमोल  देशपांडे,  प्रमोद निसळ, महाराष्ट्र प्रदेश सचिव  उमा खापरे,  जयश्री गावडे,  ज्येष्ठ मार्गदर्शक मधु जोशी हस्ते फीत कापून या आठवडे बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. दर गुरुवारी सायंकाळी 4 ते 9 या वेळेमध्ये येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या धोका प्रतिष्ठान परिसरात हा शेतकरी आठवडे बाजार भरणार आहे.

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेवर आधारित तसेच श्री छत्रपती शाहूराजे कृषी गट आयोजित   यांच्या सहकार्याने हा आठवडे बाजार भरला आहे, शेतकरी आठवडे बाजार हा नागरिकांना आरोग्यदायी जीवनाकडे नेण्याचे काम करेल, असा विश्‍वास  आमदार लक्ष्मण जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. एकीकडे मॉलच्या जमान्यात हरवत चाललेला आठवडे बाजार ही संकल्पना रुजवावी आणि शेतकरी व ग्राहकांची थेट भेट होऊन दोघांचाही फायदा व्हावा, या उद्देशाने शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना पुढे आली, अशी माहिती नगरसेवक शीतल शिंदे यांनी दिली. तसेच दर गुरुवारी भाजी खरेदी बरोबर  लकी ड्रॉ मार्फत आकर्षक बक्षिस नागरिकांना मिळविता येणार आहे, येणार असल्याची माहिती नगरसेवक शीतल शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.