Pune news : उद्योग संचालनालयाच्यावतीने निर्यातदारांचे संमेलन व प्रदर्शनाचे आयोजन

एमपीसी न्यूज : उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग व सीडबी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 व 29 सप्टेंबर रोजी डॉ. शिरनामे सभागृह, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (Pune news) येथे सकाळी 10 वाजता निर्यातदारांचे संमेलन व प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

या संमेलनाचा विषय ‘निर्यातभिमुख उद्योगाचे संमेलन’ असणार आहे. संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समूह,(Pune news) औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादन, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँकांचे अधिकारी आदी सहभागी होणार आहे.

RTI Day : माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

या संमेलनात सर्व निर्यातदार व नवनिर्यातदार उद्योजक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर यांनी केले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.