सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Yashaswi education : कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला यशस्वी एज्युकेशन (Yashaswi education) सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Bhosari News : मृत जनावरांची उघड्यावर विल्हेवाट; परिसरात दुर्गंधी

स्वावलंबी जीवन जगण्याचा मूलमंत्र आणि शिक्षणाचे जीवनातील अनन्यधारण महत्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मोलाचे कार्य केले.(Yashaswi education)त्यांच्या या योगदानाचे स्मरण करीत आपण सर्वांनी आपापल्यापरीने शिक्षण क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करण्याचा ध्यास घेतला पाहिजे, असे मत यावेळी आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे,पवन शर्मा यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

spot_img
Latest news
Related news