PLESCO : पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन; प्लेस्को दांडिया नाईटसमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक स्पर्धक होणार सहभागी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे दांडिया महोत्सव ‘प्लेस्को दांडिया नाईटस 2.0’चे (PLESCO Dandiya Night’s 2.0)  आयोजन दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पिंपळे सौदागर येथील कै. बाळासाहेब कुंजीर मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 10 हजार पेक्षा अधिक दांडिया प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक उमेश काटे यांनी दिली आहे.

पिंपळे सौदागर स्पोर्टस अँँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या (PLESCO)  वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये थेट संगीत, दांडिया रास, लाईव्ह बँड, रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यासह सहभागी व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस, सोबतच सांस्कृतिक व सुरक्षित वातावरणाची खात्री अशा अनोख्या संस्कृतीचा संगम याठिकाणी अनुभवायला मिळणार आहे.

दांडिया महोत्सव दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी 7.00 वाजता सुरु होणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून दांडिया महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश मोफत देण्यात येत आहे.

मागील वर्षी सुमारे 9 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. त्यासाठी मोफत पासची सुविधा प्लेसकोचे फांऊडर उमेश काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच नवरात्री दुर्गा उत्सवानिमित्त नवनाथ मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी सायं. देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच 17 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 19 ऑक्टोबर रोजी सायं. 8.00 वाजता महिलांच्या वतीने “महिला महाआरती” करण्यात येणार आहे. दि. 22 ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजता होमवहन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 24 ऑक्टोबर रोजी विसर्जन सोहळ्याचे पार पडणार आहे.

उमेश काटे युथ फाऊंडेशन, नाना काटे सोशल फाऊंडेशन, नवनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून माजी विरोधीपक्षनेता नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये नागरिक आणि दांडियाप्रेमींनी अधिक मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक उमेश काटे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.