PCMC : पालिकेचे 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज – कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (  PCMC)  जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर बंद असलेले सातपैकी पाच तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.

Chinchwad : बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणा – भूषण आढे

क्लोरीन गॅसची गळती झाल्याने अनेकांना बाधा झाली. सुदैवाने गंभीर प्रकार घडला नाही. त्या दिवसांपासून सर्व सात तलाव नागरिकांनी बंद करण्यात आले. सर्व तलावावरील पाणी शुद्धीकरण यंत्रणेची पाहणी करून त्रुटी दूर करण्यात आल्या.

तसेच, क्लोरीन गॅसऐवजी क्लोरीन पावडरचा वापर करून पाणी शुद्धीकरण केले जात आहे. पाण्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने तलाव नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे.

पिंपळे गुरव, पिंपरी गाव, संभाजीनगर, वडमुखवाडी, नेहरूनगर असे पाच तलाव सोमवारी (दि.16) खुले करण्यात आले आहेत. तर, कासारवाडीचा तलावातील पाण्याची चाचणी घेण्यात आली आहे.

पाणी शुद्ध असल्याने तो तलाव मंगळवारीऐवजी  गुरूवार पासून खुला करण्यात आला. केशवनगर येथील तलाव पाणी गढूळ असल्याने तो तलाव शनिवारी सुरू करण्याचे ( PCMC)   नियोजन आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.