PCMC : महापालिकेकडून 58 एकर जागा खासगी विकसकाला? नेमके काय आहे प्रकरण?

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे सिटी सेंटर (PCMC) उभारण्यासाठी 34 एकर आणि नेहरूनगर येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील 24.5 एकर जागा खासगी विकसकाला 60 वर्षांसाठी देण्यात येणार आहे. 30 ऐवजी 60 वर्षासाठी या दोन्ही जागा विकसकाला देण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या धोरणानुसार एखादा भूखंड विकसित करण्यासाठी पालिकेकडून जास्तीत जास्त ३० वर्षासाठी देण्यात येतो. याबाबत विविध विकसक व सल्लागार यांच्याशी चर्चा केल्यानंतर विकसकांकडून विशिष्ट प्रकारचे प्रकल्प सिटी सेंटरअंतर्गत करावयाचे झाल्यास किमान 60 वर्षांसाठी भूखंड दिल्यास विकसक अशा प्रकारचे प्रकल्प करण्यासाठी पुढे येतील. 30 वर्षांचा कालावधी हा अत्यंत कमी आहे. त्यामध्ये विकसकाची गुंतवणूक निधी परत मिळत नाही, असा दावा स्थापत्य प्रकल्प विभागाने केला आहे.

महापालिकेची चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई जुन्या महामार्गाशेजारील सायन्स पार्कसमोर 34 एकर जागा आहे. तेथे सिटी सेंटर नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. या सिटी सेंटरमुळे शहराची ओळख, पर्यटन वाढणार असल्याचा पालिकेचा दावा आहे. या प्रकल्पासाठी केपीएमजी या खासगी सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जागा खासगी विकसकाला 60 वर्षांसाठी देण्यात येणार आहे.

Yerawada : धक्कादायक! मटण केले नाही म्हणून पतीने केले पत्नीच्या डोक्यात वार

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमयची 24.5 एकर जागा (PCMC) आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांपर्यंत पोहोचली आहे. अद्याप शहरात इतर शहराप्रमाणे अद्ययावत क्रीडा संकुल नाही. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक भूखंड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमार्फत विकसकाने विकसित करून क्रिकेट स्टेडियम उभारले आहे.

त्या धर्तीवर अण्णासाहेब मगर स्टेडियम विकसकांमार्फत विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागारांची नेमणूक करून तांत्रिक सल्ला मागविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा भूखंड सुद्धा 60 वर्षांसाठी विकसित करण्यासाठी दिल्यास चांगल्या प्रकारचे विकसक येऊ शकतील, असा दावा स्थापत्य प्रकल्प विभागाने केला आहे. त्यासाठी सिटी सेंटर व मगर स्टेडिमयची जागा 30 ऐवजी 60 वर्षांसाठी विकसकाला देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.