PCMC : शहरात आढळले 650 ऍनिमियाचे रुग्ण

एमपीसी न्यूज – केंद्र व राज्य शासनाच्या ऍनिमिया मुक्त भारत मोहिमेच्या (PCMC) धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ‘मिशन अक्षय – ऍनिमिया मुक्त पीसीएमसी’ मोहिम राबविण्यात येत आहे. ऍनिमिया मुक्त कॉर्नरचे माध्यमातून 650 रुग्ण आढळले. या सर्व रुग्णांना उपचारात्मक व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यात आलेल्या आहेत.

‘मिशन अक्षय – ऍनिमिया मुक्त पीसीएमसी’ रक्तक्षय ही बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती आणि स्तनदा मातांमध्ये आढळणारी समस्या असून यामुळे शारीरीक वाढ योग्य रितीने न होणे, शारीरिक कार्यक्षमता कमी असणे, बालकांची शारीरीक व बौध्दिक वाढ कमी होणे, संसर्गजन्य रोगास बळी पडणे यांसारखे दुष्परिणाम होतात. यासाठी बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम स्त्रिया, व गर्भवती आणि स्तनदा माता यांच्यातील लोहाची कमतरता/रक्तक्षय ओळखून/तपासून त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये ‘मिशन अक्षय – ऍनिमिया मुक्त पीसीएमसी’ मोहिम राबविण्यात (PCMC) येत आहे. सदरची मोहिम ही अंगणवाडी, मनपा शाळा व मनपा दवाखाना व रुग्णालयामध्ये ऍनिमिया मुक्त कॉर्नरच्या माध्यमातून राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत अपेक्षित लाभार्थी गटास ऍनिमिया मुक्त भारत अंतर्गत राज्य शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार प्रतिबंधात्मक लोहयुक्त औषध व गोळया देण्यात आल्या.

Maharashtra : शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

6 महिने ते 59 महिने वयोगटातील 24, 651 बालकांना लोहयुक्त सिरप, महापालिकेतील शाळांमधील 5 ते 10 वर्षे वयोगटामधील 30,482 विद्यार्थ्यांना लोहयुक्त गुलाबी गोळ्या, 11 ते 19 वर्षे वयोगटामधील 31,156 विद्यार्थ्यांना लोहयुक्त निळ्या गोळ्या दरमहा एप्रिल 2022 पासून देण्यात आल्या आहेत.

तसेच वर्ग शिक्षकांमार्फत प्रत्येक आठवड्याचे सोमवारी विद्यार्थ्यांस लोहयुक्त गोळी सेवन करण्यासाठी द्यावी याकरीता सर्व शाळांना सुचित करण्यात आलेले आहे. तसेच 20 ते 49 वर्षे प्रजननक्षम वयोगटातील 32,669 महिलांना व 4369 गरोदर व स्तनदा मातांना लाल गोळ्या सेवन करण्यासाठी दिल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय (PCMC) अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.