PCMC : महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु

एमपीसी न्यूज – बेकायदा होर्डिंग कोसळून (PCMC) पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेला जाग आली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. मुंबई-बंगळुरु सेवा रस्ता, हिंजवडी रोड आणि ताथवडेतील असे 4 होर्डिंग गुरुवारी काढले आहेत.

किवळे येथे होर्डिंग पडून झालेल्या अपघातामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने होर्डिंग मालकांची बैठक घेतली. शहरातील अनधिकृत 433 आणि अधिकृत 1 हजार 407 लोखंडी जाहिरात होर्डिंग धारकांनी येत्या 15 दिवसात संरचना मजबुतीचे (स्थिरतेचे) प्रमाणपत्र, जाहिरात फलकाच्या दहा बाय आठ इंचाच्या छायाचित्राच्या दोन प्रती आकाशचिन्ह व परवाना विभागात सादर कराव्यात. अन्यथा संबंधित फलक मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा इशारा दिला आहे.

Pune Rain : पुण्यात गारांचा पाऊस; यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी गारपीट

त्यानंतर गुरुवारी अनधिकृत होर्डिंगवर कारवाईस सुरुवात केली. मुंबई-बंगळुरु सेवा (PCMC) रस्ता, हिंजवडी रोड आणि ताथवडेतील असे 4 होर्डिंग काढले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेने देखील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईस सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.