Pune : कुख्यात गुंडाच्या पत्नीचा भाजपमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

एमपीसी न्यूज : पुण्यात भाजपमध्ये कुख्यात गुंडाच्या पत्नीचा (Pune) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत  जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला. यामुळे भाजपवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. 

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी आज भाजप पक्ष कार्यालयात भाजपात प्रवेश केला. शरद मोहोळ हा गुंड असून त्याच्याविरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात गुन्हे दाखल आहेत.

इतकेच नव्हे तर त्याच्या विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई देखील केली असून दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील तो आरोपीही आहे.  कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता.

Pune Rain : पुण्यात गारांचा पाऊस; यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी गारपीट

त्यामुळे आज एका आरोपीच्या पत्नीने पक्ष प्रवेश केल्याने भाजपमध्ये सर्व गुन्हे (Pune) माफ होतात का? अशा टीकेला सुरुवात झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.