PCMC : जिजामाता रुग्णालयातील विभागातील अपहार; लेखा परीक्षण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ( PCMC) पिंपरी कॅम्प येथील जिजामाता रूग्णालयाच्या लिपिकाने कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने पगार काढून त्यातील अर्धी रक्कम स्वतः घेतली. त्यात 16 लाख 10 हजार 929 रुपयांचा अपहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी वैद्यकीय विभागाचे लेखा परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्थिक अपहार करणारे लिपिक दत्तात्रय विठ्ठल पारधी याला आयुक्त शेखर सिंह यांनी यापूर्वीच निलंबित केले आहे. तसेच, विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. लिपिक पारधी याने कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार काढल्याचे आढळून आले.

त्यातील अर्धी रक्कम लिपिक आपल्या बॅंक खात्यावर जमा करून घेत होता. हा प्रकार सप्टेंबर 2020 ते मार्च 2023 पर्यंत असा अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ बिनभोबाट सुरू होता. त्यात 16 लाख 10 हजार 929 इतका आर्थिक अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

Pune : पुण्यात मित्रानेच केले मित्राचे अपहरण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

तसेच, त्यात नेमका किती रकमेचा अपहार झाला आहे, हे शोधण्यासाठी या प्रकरणाचे लेखा परीक्षण केले जाणार आहे. लेखा परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याचा विचार महापालिका प्रशासन करीत आहे.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, कामावर नसलेल्या मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ( PCMC) पगार काढून त्यातील काही रक्कम संबंधित लिपिक घेत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास झाला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी लेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.