Pcmc Election 2022 : आरक्षण सोडत रद्द होणार, नव्याने आरक्षण काढणार; ओबीसींसाठी ‘एवढ्या’ जागा

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने सादर (Pcmc Election 2022) केलेला बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक शाखेने 31 मे 2022 रोजी काढलेली सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द होईल. एससी, एसटीची आरक्षण सोडत कायम राहील. त्यामुळे ओबीसीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येईल. ओबीसींसाठी 30 ते 35 जागा राखीव राहतील.

पिंपरी महापालिकेत 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात  19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14  या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळाल्याने सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. सर्वसाधारणामधून ओबीसींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल आहे.  ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणानुसार अंदाजे ओबीसींसाठी 30 ते 35 जागा राहतील. त्यातील निम्या जागा महिला आणि निम्या जागा पुरुषांसाठी राहतील.

Pune News: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

याबाबत निवडणूक विभागाचे (Pcmc Election 2022) सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर म्हणाले, ”ओबीसी समाजाला किती टक्के राजकीय आरक्षण मिळाले आहे, याची नेमकी आकडेवारी अद्यापर्यंत मिळाली नाही. अंदाजे 30 ते 35 जागा ओबीसी समाजाला मिळतील. त्यातील निम्म्या जागा महिलांसाटी राहतील. नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येईल. एससी आणि एसटीचे आरक्षण कायम राहील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.