PCMC : जलतरण तलावाच्या तिकीट दरात वाढ; आता इतके पैसे मोजावे लागणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावाचे र (PCMC)  तिकीट व पास दरात दुप्पटीने वाढ केली असून आता 45 मिनिटे पोहण्यासाठी 10 रूपयांऐवजी 20 रूपये मोजावे लागणार आहेत. तसेच पास दरातही वाढ केली आहे.

महापालिकेचे 13 जलतरण तलाव आहेत. त्यात निगडीतील छत्रपती शिवाजी महारात तलाव, संभाजीनगरातील साई अ‍ॅक्वामरीन तलाव, मोहननगरातील राजर्षी शाहू महाराज तलाव, केशवनगरातील बाळासाहेब गावडे तलाव, नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम तलाव, भोसरीतील बाळासाहेब लांडगे तलाव, वडमुखवाडीतील संत ज्ञानेश्वर महाराज तलाव, यमुनानगर येथील तलाव, थेरगाव येथील खिंवसरा पाटील तलाव, पिंपरी गावातील तलाव, सांगवीतील बाळासाहेब शितोळे तलाव, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव, पिंपळे गुरव येथील काळूराम जगताप तलाव असे तलाव आहेत.

Mahalunge : किरकोळ कारणावरून महिलेला चौघांकडून मारहाण

जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न व त्यावर होणार खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी जलतरण तलाव शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यानुसार पोहण्याची एक बँच 45 मिनिटांची असते.

त्यासाठी आता 20 रूपये मोजावे लागणार आहेत. हे तिकीट ऑनलाइन आदल्या दिवसांपर्यंत काढावे लागते. अन्यथा तलावावर प्रवेश दिला जात नाही. तसेच, 12 ते 60 वयोगटांतील सर्व नागरिकांना एका महिन्याच्या पाससाठी 400 ऐवजी 500 रूपये खर्च करावा लागणार आहे. तर, तीन महिन्यांसाठी 700 ऐवजी 1 हजार 200 रूपये दर आहे. वर्षभराच्या पाससाठी 1 हजारऐवजी 4 हजार 500 रूपये भरावे लागणार आहेत. लॉकर फी तीन महिन्यांसाठी 50 ऐवजी 300 रूपये व वर्षासाठी 100 ऐवजी 1 हजार 200 रूपये असणार (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.