PCMC : आता महापालिकेच्या थेरगाव, भोसरी रुग्णालयातही पदव्युत्तर अभ्यासक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. पोस्ट ग्रॅज्युट कोर्सेस सुरु करण्यास डीएनबी बोर्डाने परवानगी दिली. त्यामुळे वैद्यकीय विभागात मानाचा तुरा रोवला गेला असून एमबीबीएस झालेले डॉक्टर महापालिकेला उपलब्ध होणार आहेत.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत त्यास परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता नवीन थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालयातही पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु होणार आहे.

एमबीबीएसनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम असून दोन वर्षांसाठीचे आहेत. डीएनबी बोर्डाने 14 जागांना मंजुरी दिली आहे. थेरगाव रुग्णालयासाठी 12 जागा असणार आहेत. त्यात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ विभागासाठी प्रत्येकी 4 अशा 12 जागा असणार आहेत. तर, भोसरी रुग्णालयातील स्त्रीरोग विभागासाठी 2 जागांसाठी मान्यता मिळाली आहे. एमबीबीएस झालेले विद्यार्थी शिकण्यासाठी येणार आहेत.

Kasarwadi : कासारवाडीत झाड पडले

या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राध्यपकांची भरती केली जाणार नाही. महापालिका रुग्णालयातील उपलब्ध डॉक्टरच (PCMC) शिकविणार आहेत. एमबीबीएस झालेले हे डॉक्टर चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे मनुष्यबळ वाढणार असून सेवा पुरविण्यासाठी फायदा होणार आहे.

याबाबतची माहिती देताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, डीएनबी पदव्युत्तर कोर्स सुरु झाल्यामुळे एमबीबीएस शिक्षण झालेले डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधा नागरिकांना सक्षमपणे देण्यास फायदा होणार आहे.

त्यासाठी नवीन प्राध्यापक भरण्याची आवश्यकता नाही. सद्यस्थितीतील डॉक्टरांच्या अधिपत्याखालीच शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांचा कोणताही खर्च न वाढता हे कोर्स सुरु होणार आहेत. भविष्यात इतर विषयांसाठी सुद्धा अर्ज करणार आहोत. आकुर्डी, जिजामाता रुग्णालयातही असे कोर्सेस सुरु करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.