PCMC : महापालिका कार्यक्षेत्रामधील रेडझोन क्षेत्राचे नकाशे, सर्व्हेची माहिती प्रसिद्ध करा – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील (PCMC) रेडझोन क्षेत्राचे नकाशे व सर्व्हेची माहिती प्रसिद्ध करण्याची मागणी माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात उबाळे यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहरामध्ये संरक्षण क्षेत्र म्हणजेच रेडझोनची हद्द काही ठिकाणी आहे. त्यामुळे या हद्दीमध्ये सामान्य नागरिकांना सुखसोयी मिळत नाहीत. तसेच मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेता येत नाही, जमीन विकसित करता येत नाही, जुने बांधकाम असेल तर त्याचा पुनर्विकास सुद्धा करता येत नाही. तसेच घरांची विक्री सुद्धा करता येत नाही. अशा असंख्य समस्या सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत.

Chakan News : चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायासह एकाला दहा हजारांची लाच घेताना अटक

तसेच रेडझोन बाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. यामध्ये कोणते क्षेत्र हे रेडझोन हद्दीमध्ये येते याची नागरिकांना पुरेशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. (PCMC) त्यामुळे पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामधील रेडझोन हद्दीबाबत सर्व्हे क्रमांक तसेच प्लॉट क्रमांकानुसार नकाशे आणि रेडझोनची हद्द नव्याने लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावेत. यामुळे सामान्य नागरिकाची होणारी फसवणूक थांबण्यास अटकाव होईल.  यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, मोरेवस्ती भागातील नागरिकांचे रेडझोन विषयी असलेले संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.