Chakan News : चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायासह एकाला दहा हजारांची लाच घेताना अटक

एमपीसी न्यूज : चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan News) पोलीस शिपायासह एका खाजगी इसमावर 10,000 रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे . पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

याबाबत 32 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली होती. चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईट दूरक्षेत्र येथे नेमलेले पोलीस शिपाई संतोष पंदरकर यांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. पंदरकर व खाजगी इसम किसन आंद्रे, रा. पाळू पाईटगाव, ता. खेड, जि. पुणे या दोन आरोपींच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7, 7 अ व 12 अन्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाणे येथे पोक्सो कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक पंदरकर यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.

Pune News : अशोक कुमार मिश्र यांनी स्वीकारला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार

या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता चाकण पोलीस ठाणे येथेली पोस्को कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे लोकसेवक पोलीस शिपाई पंदरकर व खाजगी इसम आंद्रे यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग(ला. प्र. वि), पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत. पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला. प्र. वि, पुणे परिक्षेत्र, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव ला. प्र. वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.