Pune News : अशोक कुमार मिश्र यांनी स्वीकारला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार

एमपीसी न्यूज :  पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. (Pune News) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, यांना सदस्य, पायाभूत सुविधा, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

अशोक कुमार मिश्र हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग (IRSME) चे वरिष्ठ अधिकारी आहेत. ते सध्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आहेत.

मिश्र यांनी इंग्लंड येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅकेनिकल इंजिनियर्स, इंग्लंडचे ए. एम. आय. (Mech.) ई. ची पदवी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, कोलकाता येथून; इंग्लंड येथील इंजिनिअरिंग परिषद ( Engineering Council) इन्स्टिट्यूट ऑफ मॅकेनिकल इंजिनियर्सची ए. एम. आय. ई. (मेट.) चे उत्पादन अभियांत्रिकी (Production Engineering) इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स, कोलकाता येथून आणि IGNOU मधून MBA पूर्ण केले आहे.

Sangavi News : खेळणी व फॅन्सी ड्रेस, पुस्तकांच्या प्रदर्शनासह स्वादिष्ट, रुचकर खाद्यपदार्थांची रेलचेल

मिश्र 1983 च्या स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस बॅचद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरच्या भारतीय रेल्वे सेवेत रुजू झाले. त्यांना रेल्वे व्यवस्थापन आणि प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. (Pune News) पश्चिम रेल्वेतील दाहोद येथे असिस्टंट वर्कशॉप मॅनेजर (रिपेर) म्हणून करिअरची सुरुवात केली. पश्चिम रेल्वे, आरडीएसओ आणि उत्तर रेल्वेत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांनी भावनगर येथे विभागीय मॅकेनिकल अभियंता (कॅरेज आणि वॅगन), विभागीय मॅकेनिकल अभियंता (डिझेल), वाटवा आणि वरिष्ठ विभागीय मॅकेनिकल अभियंता, वडोदरा येथे काम केले आहे. त्यांनी कोटा विभागात सिनिअर ईडीपीएम आणि उपमुख्य मॅकेनिकल अभियंता (रिपेर) म्हणूनही काम केले आहे.

मिश्र यांनी मुख्य रोलिंग स्टॉक अभियंता, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक/प्रयागराज, मुख्य मोटिव्ह पॉवर अभियंता/डिझेल आणि उत्तर मध्य रेल्वेवर झाशी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि पूर्व मध्य रेल्वेत प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

मिश्र यांनी झाशी स्थानकाच्या चौथ्या लाईनच्या निर्माणात मोलाचा वाटा उचलला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक/झाशी या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या सर्वेक्षणात पुढाकार घेतला आणि झाशी स्थानकाच्या पुनर्विकासासह अनेक प्रशासकीय कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

उत्तर मध्य रेल्वेवर अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक/प्रयागराज म्हणून काम करताना त्यांना रेल्वे मंत्री राजभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.