PCMC : सर्वेक्षणात नोंदणी नसलेल्या अडीच लाख मालमत्ता सापडणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी ( PCMC) विभागाच्या वतीने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मालमत्तांना क्रमांक देणे सुरू आहे. आत्तापर्यंत 2 लाख 72 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण, क्रमांक टाकून झाले आहेत. वाकड झोनमध्ये 74 हजार मालमत्तांपैकी तब्बल 29 हजार 564 नोंद नसलेल्या मालमत्ता आढळून आल्याची  माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सुमारे अडीच लाख नोंद नसलेल्या मालमत्ता आढळतील, असा दावा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मोकळ्या जागा अशा 6 लाख 15 हजार मिळकती नोंदणीकृत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षातील पावणे आठ महिन्यात 625 कोटींचा मालमत्ता कर पालिका तिजोरीत जमा झाला आहे.

Pune : थायलंड मधील गणेश भक्तांकडून ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला रुग्णवाहिका

अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण, मालमत्तांना क्रमांक देणे सुरू आहे. आत्तापर्यंत 2 लाख 72 हजार मालमत्तांचे सर्वेक्षण, क्रमांक टाकून झाले आहेत. वाकड झोनमध्ये 74 हजार मालमत्तांपैकी तब्बल 29 हजार 564 नोंद नसलेल्या मालमत्ता आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

या नव्याने आढळून आलेल्या मालमत्ता धारकांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतर सुनावणी घेऊन त्यांच्या मालमत्तांची नोंदणी केली जाईल. निवासी मालमत्तांची नोंदणी करून व्यावसायिक वापर होत असल्याच्याही अनेक मालमत्ता सापडत आहेत. यांनाही त्यांच्या वापरानुसार कर लावण्यात येणार आहे.

नागरिकांनी कर भरण्यासाठी कर संकलन विभागाला धनादेश दिले आहेत. मात्र, एकाच प्रभागात 100 धनादेश बाऊन्स झाले आहेत.   इतर प्रभागातीलही आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅंक खात्यावर पैसे नसताना धनादेश देऊन पालिकेची फसवणूक करणा-या नागरिकांवर गुन्हे दाखल करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील यांनी दिले ( PCMC) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.