Pune : थायलंड मधील गणेश भक्तांकडून ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टला रुग्णवाहिका

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ख्याती भारतातच नव्हे ( Pune )  तर जगभरात आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा हे लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असून चक्क थायलंड फुकेत येथून अनेक भाविक दरवर्षी पुण्यात श्रीं च्या दर्शनाला सातत्याने येतात. त्यातील एक भक्त, फुकेत येथील रहिवासी पापासॉर्ण मिपा यांनी दगडूशेठ च्या सामाजिक कार्याला हातभार लावत जय गणेश रुग्णसेवा अभियान करिता दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत.

Maharashtra : प्रदूषीत नद्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, मुळा सर्वाधिक प्रदूषित यादीत तर त्याखालोखाल पवना नदीचा क्रमांक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाकडे पापासॉर्र्ण मिपा यांनी या रुग्णवाहिका नुकत्याच सुपुर्द केल्या. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

थायलंडहून अनेकांना पुण्यात दर्शनासाठी येण्याची इच्छा आहे, मात्र अंतर खूप असल्याने शक्य होत नाही. याकरिता मी फुकेत येथे मंदिर उभारत आहे, अशी माहिती फुकेत येथील उद्योजीका पापासॉर्ण मिपा अशी यांनी ( Pune ) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.