PCMC News : महापालिका 12 लाखांचे पांढरे उंदीर खरेदी करणार

एमपीसी न्यूज –   पिंपरी-चिंचवड महापालिकेने संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (PCMC News) 163 रुपयांस एक या प्रमाणे 7 हजार 200 उंदीर खरेदी करण्यासाठी महापालिका 11 लाख 73 हजार 600 रुपयांचा खर्च करणार आहे.

चिंचवड – संभाजीनगर येथे महापालिकेचे संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय आहे. पुर्वी ते सर्पोद्यान म्हणून ओळखले जात. सध्या या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण सुरु आहे. येथील सर्पोद्यानात आजमितीला विविध प्रजातींचे 180 साप आहेत. सापाचा मुख्य आहार उभयचर आणि मासे असून ते बेडूक, टॅडपोल आणि टॉड्स खातात. या व्यतिरिक्त सरडे, त्यांची अंडी, उंदीर, कीटक, लहान पक्षी, त्यांची अंडी आणि पिल्ले, वटवाघुळ, लहान खार आदी सापांचे प्रमुख खाद्य आहे.

Pune Crime : रेल्वे मध्ये टी सी म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत पुण्यातील तरुणांची फसवणूक

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे सापांच्या खाद्यांसाठी पांढरे उंदीर खरेदी केले जातात. दोन वर्षाच्या कार्यकालासाठी 11 लाख 88 रुपयांची निविदा महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली. तीन ठेकेदारांनी त्यात सहभाग घेतला. त्या पैकी सॅम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने 165 रुपये प्रती उंदीरऐवजी 163 रुपयांत उंदीर पुरविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, त्यांच्याकडून 7 हजार 200 उंदीर खरेदी केले जाणार आहे.(Pune News) या पुरवठ्यासाठी ठेकेदाराला 11 लाख 73 हजार 600 रुपये अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. खाद्य पुरवठादाराने चांगल्या दर्जाचे पांढरे उंदीर न दिल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पांढर्‍या उंदरांमुळे विषबाधा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरवठादाराची असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.