_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade News : माळवाडी हद्दीतील घनकचरा नगर परिषदेच्या कचरा डेपोत टाकण्यास परवानगी

0

एमपीसी न्यूज – ग्रामपंचायत माळवाडी हद्दीतील घनकचरा तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील कचरा डेपोत वार्षिक भाडे तत्वावर टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याबद्दल ग्रामपंचायत माळवाडी कडून वार्षिक भाड्याचा धनादेश व आभारपत्र नगरपरिषद प्रशासनास प्रदान करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

रोजचा कचरा कुठे टाकायचा हा माळवाडी ग्रामस्थापुढे मोठा प्रश्न होता. त्यास अनुसरून माळवाडी ग्रामपंचायती कडून तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासनाला व लोकप्रतिनिधी यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी विनंती पत्र देण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

यापत्राबाबत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जा.क्र.२०४४/२०२१ दिनांक ७/४/२०२१ नुसार नियम व अटीस बांधील राहून वार्षिक भाडे २५ हजार प्रमाणे भाडे घेऊन कचरा कचरा डेपोत टाकण्याची परवानगी देण्यात आली.

त्याप्रमाणे २५ हजार रुपयाचा धनादेश व कचरा टाकण्यास परवानगी दिल्याबद्दल माळवाडी ग्रामस्थाकडून आभारपत्र उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना देण्यात आले. यावेळी आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे, उपसरपंच सुनील भोंगाडे, माजी सरपंच चंद्रकांत दाभाडे, दीपक दाभाडे, किशोर दाभाडे, विनोद अल्हाट, अर्जुन अल्हाट, ऋषिकेश साखरे, मयूर दाभाडे व ग्रामसेवक भाऊसाहेब खेसे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment