Pimple Gurav : शाडू मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा उत्साहात; सत्तर मुलांसह महिलांचाही सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे भारतीय कला माध्यम व दिलासा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथे महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात रविवारी कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उदघाटन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले. गणपती पूजनाने आणि कवी देवेंद्र गावडे यांनी गणेश गीत गाऊन कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली.

यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले कि, पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करावा, असे सर्वजण म्हणतात पण, विद्यार्थ्यांकडून आणि नागरिकांकडून कृतीशील कामे करवून घेत शाडू मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा होत आहे. आपण सारेजण पर्यावरण संवर्धनासाठी कटीबद्ध आहोत. नागरिकांनी येत्या गणेशोत्सवात शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना घरोघरी करावी, असे आवाहनही जोगदंड यांनी यावेळी केले.

  • भारतीय कला माध्यमचे अध्यक्ष मूर्तीकार, चेतन हिंगे म्हणाले की, आम्ही सर्वांना माती आणून देतो. तसेच वेगवेगळ्या सोसायटया,अर्पांटमेंट आणि महानगरपालिकेच्या शाळेत जाऊन कार्यशाळा घेतल्या आहेत. यापुढे ही गणपती स्थापनेपर्यंत आमची कार्यशाळा चालू राहणार आहे. विकलेल्या गणेशमूर्तीमधून जे पैसे जमा होतील ते आम्ही पुरग्रस्तासाठी देणार आहोत.

या कार्यशाळेत सत्तर मुलांसह महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, भारतीय कला माध्यमचे अध्यक्ष चैतन हिंगे, तसेच माजी ग्रामविकास अधिकारी गणपत वायकर, प्रियंका माने, शिल्पा कोडवार,अर्चना खैर यांनी सहभाग नोंदवला. तर, संतोष हिंगे, गजेंद्र आस्वार,गणेश दिवेकर, सागर वायकर,सागर भड,यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर दळवी यांनी केले. तर नम्रता दिवेकर व अर्चना अस्वार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.