Pimple Saudagar News: स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची नगरसेवक नाना काटे यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागरमधील गोविंद यशदा चौक ते काटे वस्ती पर्यत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन इत्यादी विकास कामांची माजी विरोधी पक्षनेते, नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज (शनिवारी) पाहणी केली. ट्रियॅास सोसायटी व झुलेलाल टॅावर सोसायटीकडे जाणार्‍या 18 मीटर रस्त्याची पाहणी देखील करण्यात आली. या रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरूस्त करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सुचना केल्या.

या पाहणीवेळी ट्रियॅास सोसायटीचे योगेश सरदेशपांडे, किशोर पगरूड, पंकज पालवे, राजेश पाटील, सुनील वाधवा, प्रविण कोहीनकर, प्रमोद बडगुजर, जगदीश सोनवणे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामाचां पाहणीवेळी प्रत्येक सोसायटी समोरील इन्ट्री गेट व्यवस्थीत करणे, सोसायटी चे स्ट्रॅाम वॅाटर लाईन, ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या लाईन संदर्भात त्रुटी दुर करून ती कामे लवकरात लवकर पुर्ण करून देण्यात याव्यात अश्या सुचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

यावेळी साई आर्चिड सोसायटीचे परेश महाजन, राजकुमार शर्मा, शिदें काका, सतर्के काका, सिमरण कॅार्नर सोसायटीचे चेअरमन राकेश तुलसाणी, मनोज मालपाणी, राकेश तुलसानी, मंगेश सावर्डेकर, हर्षद बापट, श्री. मानस सिन्हा तुषार गार्डन फेज 2 सोसायटीचे प्रशांत पाटील, महेश शेट्टी, केदार जठार, शिवानंद पटणे, अशोक चव्हाण, तावरे काका, गणेश पार्क सोासटी चे चेअरमन सुनिल मुलचंदानी, जतिन कदम, विनोद उपाध्याय आदी उपस्थित होते.

ट्रियॅास, सिमरन कॅार्नर, तुषार गार्डन फेज 2, गणेश पार्क, साई आर्चिड, साई गार्डन, या सोसायटीच्या वतीने नगरसवेक नाना काटे यांचा सन्मान करण्यात आला. पाहणीवेळी महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे अभियंता कोल्हे, कनिष्ठ अभियंता शिर्के, बी.जी शिर्के कंपनीचे टि.के. चव्हाण, बांदल, गाढवे, धायगुडे आदी अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.