Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट : शहरातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड, वाकड, सांगवी, हिंजवडी परिसरातून सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाखांच्या दुचाकी चोरल्या असून याप्रकरणी गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किरण प्रकाश जाधव (वय 28, रा. एमआयडीसी भोसरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास किरण यांनी त्यांची एम एच 28 / ए एच 9691 ही 35 हजार रुपयांची दुचाकी केएसबी चौकातील वालीया कंपनीच्या गेटसमोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली.

दीपक मोकिंद कंधारे (वय 25, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी जी 9921 ही दुचाकी 9 सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 10 सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.

अमित आदिक साळुंके (वय 21, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच एन 9585 ही मोपेड दुचाकी 16 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास काळेवाडी येथील मिट्स फिटनेस येथे पार्क केली. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. अमित त्यांचे काम संपवून साडेनऊच्या सुमारास आले असता हा प्रकार उकडीस आला.

धनंजय देविदास भारंबे (वय 47, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय यांनी त्यांची त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए सी 0670 ही मोपेड दुचाकी गुरुवारी (दि. 19) दुपारी चारच्या सुमारास ज्योतिबा गार्डन समोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. धनंजय सव्वाचारच्या सुमारास त्यांच्या दुचाकीजवळ आले असता ती चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

शिवशंकर सावराप्पा तलाटी (वय 49, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवशंकर यांनी 18 ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांची एम एच 12 / जे आर 5003 ही स्प्लेंडर मोटारसायकल फेज एक येथील एसजेपीएल कंपनीसमोर पार्क केली. पाऊण तासानंतर ते मोटारसायकल पार्क केलेल्या ठिकाणी आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, दुचाकी मिळाली नसल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like