Pimpri : संतांच्या सानिध्यात शांती अन् आध्यात्मिक आनंदाची अनुभूती – दिव्ययशाजी

एमपीसी न्यूज – संतांच्या तप, त्याग, संयम आणि भेदभावरहित विचारामुळे त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येकजण परम शांतीचा आणि आध्यत्मिक आनंदाची अनुभूति प्राप्त करतो, असे उदगार साध्वी आनंदश्रमणी रत्न उपप्रवर्तीनी कंचनकुंवरजी यांच्या शिष्या दिव्ययशाजी यांनी काढले.

आकुर्डीस्थित श्री वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी निगडी-प्राधिकरण येथे चतुर्मासानिमित्य वास्तव्यास असलेल्या साध्वी आनंदश्रमणी रत्न उपप्रवर्तीनी कंचनकंवरजी यांचा 59 वा जन्मोत्सव आध्यत्मिकरित्या मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

  • यावेळी सुशिष्या दिव्ययशाजी आपल्या गुरुभगिनी कंचनकंवरजी यांच्याबद्दल म्हणाल्या की, अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या तप, त्याग, संयमाच्या भट्टीत तप्त होऊन जीवनाला सोन्याचा निखार प्राप्त करून दिला म्हणूनच भारत भूमी ही संतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते, त्याच श्रंखलेत एक दिव्यात्मा ज्यांनी महाराष्ट्रातील माजलगावच्या पवित्र भूमीवर ओस्तवाल कुळात जन्म घेऊन माता सूरजबाई आणि पिता पन्नालालजी यांच्या संस्कारात वाढून धार्मिक आध्यत्मिक शास्त्राचे अध्ययन करून आचार्य सम्राट आनंदऋषिजींच्या चरणी जीवन समर्पित करून घोडनदी येथे दि. 15 जानेवारी 1976 रोजी संयम जीवन आंगिकार करत दीक्षा घेतली. तेंव्हाच गुरूंनी त्यांचे कंचनकंवरजी असे नामकरण केले.

पुढे महासतीजींच्या दुसऱ्या शिष्या मलयाश्रीजी म्हणाल्या की, कंचनकंवरजी महासतीजिनी संयमी जीवनात ज्ञान, दर्शन, चरित्र व जप तपच्या अराधनेचा खडतर मार्ग आंगिकार करीत आपल्या जप तप साधनेच्या जोरावर कर्मनिर्जरा करुन आपल्या नावाप्रमाणे जीवन कंचनमय बनविले, साधे व सरळ जीवन आणी शांत व शीतल सभावच्या जोरावर कमी वेळेत अनेक प्रदेशात विचरण करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, तमिलनाडु, कर्नाटक असा अनेक प्रदेशात आपले भक्तगण निर्माण करुन जिनवाणीचा प्रचार प्रसाराद्वारे लोकांना सत्य, अहिंसा तत्वांची शिकवण देत आपले नावलोकिक वाढविण्या बरोबरच आपले शिष्यगण निर्माण केले. त्यांच्या तप, त्याग, संयम व भेदभावरहित विचाराणमुळे त्यांच्या संपर्कात येणारा प्रत्येकजण परम शांतीचा आणि आध्यत्मिक आनंदाची अनुभूति प्राप्त करतो.

  • कंचनकंवरजी यांची महती संगताना अणिमाश्रीजी म्हणाल्या की, आपल्या स्वतःच्या आध्यत्मिक उन्नति बरोबरच त्यानी आमच्यासारख्या शिष्यगनींना आध्यत्मिक शिक्षणाने संस्कारित करून आमच्या जीवनाला पैलू पडण्याचे कार्य करून आम्हाला परिपूर्ण बनविल्यामुळेच त्या आमच्या हृदयकमळी विराजित आहेत. म्हणूनच यांच्या 59 व्या वाढदिवसी त्यांना आत्मशुद्धि व वीतराग साधना प्राप्त होऊन सिद्धालय प्राप्तिचे आपले लक्ष्य साध्य होण्यासाठी आमच्या सर्व शिष्यगनींतर्फे शुभेच्छा दिल्या.

त्याप्रसंगी व्यासपीठावर आनंदश्रमणी रत्ना उपप्रवर्तिनी कंचनकंवरजी, किरणकंवरजी, दिव्ययशाजी, अरहश्रीजी, मलयाश्रीजी,  अणिमाश्रीजी, विराज्ञाजी आदी महासतीवृंद विराजमान होत्या.

  • तसेच त्याप्रसंगी तपगंगोत्री श्रीमती मीराबाई लुनिया यांच्या 522 आयंबिल उपवासाच्या तपोपूर्ती निमित्ताने श्री वर्धमान जैन श्रावक संघ आकुर्डी निगडी-प्राधिकरणा संघाध्यक्ष संतोष कर्नावट व खजिनदार मनोज सोळंकी सर्व विश्वस्त मंडळाद्वारे त्यांचा सन्मान केला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 59 जणांनी रक्तदान केले. महासतीजींना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने दूरदूरच्या गावातून साध्वीजिंचा भक्तगन उपस्थित होता.

यावेळी राजेंद्र रातडिया, सूर्यकांत मुथियान, पोपटलाल कर्नावट, धनराजजी छाजेड, जवाहरलालमुथा, विजयओस्तवाल, श्रीमती मिरबाई लुनिया सहितमध्ये साध्वी कंचनकवर, अरहश्री, सुभाष ललवानी, प्रकाशजी मुणोत, संघाध्यक्ष संतोष कर्नावट, राजकुमार खिवंसरा, राहुल पारख, श्यामसुंदर बोरा, राजेंद्र छाजेड तथा मदनलाल कांकरिया, अशोक पगारिया, मनोजजी सोळंकी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.