Pimpri : अमृता फडणवीस यांच्या निषेधार्थ सेनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ट्विटरवरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे निदर्शने करण्यात आली.

आडनाव ठाकरे असल्याने कोणी ठाकरे होत नाही असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी ट्विटर वर केले आहे त्याचा सेनेच्या महिला आघाडीतर्फे निषेध करण्यात आला.

शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नगरसेविका मीनल यादव ,तसेच अनिता तुतारे, आशा भालेकर, वैशाली मराठे, प्रतीक्षा घुले, जना गोरे, शशिकला उभे, वैभवी घोडके, नंदा दातकर, कामिनी मिश्रा, भारती चकवे, भाग्यश्री म्हस्के, शिल्पा अनपन, शर्वरी जळमकर, नजमा शेख, यमू मोगरे, निर्मला पाटील आदी कार्यकर्त्या सहभागी होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.