Pimpri: सावधान ! शहरात बाधित युवकांचा आकडा पाचशेपार

Pimpri: Be careful! The number of affected youths is above five hundred शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहे. दिवसाला 80 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. शहरातील 1323 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा जास्त धोका वयोवृद्ध आणि लहान मुलांना असला तरी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांना आहे. कोरोनाने अक्षरश: युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 526 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहराच्या नवीन भागात रुग्ण सापडत आहे. दिवसाला 80 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहेत. शहरातील 1323 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक युवकांची संख्या आहे.

कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण 22 ते 39 वयोगटातील युवकांमध्ये आहे. आजपर्यंत शहरातील तब्बल 526 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील तब्बल 526 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 321 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 174 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 158 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 143 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

सक्रिय 263 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत!

पिंपरी-चिंचवड शहरातील 1323 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 770 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आजमितीला 532 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 263 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण त्यांना काहीच लक्षणे नाहीत.

तर, 120 रुग्णांमध्ये लक्षणे असून 23 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, शहरातील 22 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.