Pimpri : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, पिंपरी चिंचवड महापालिकेचे (Pimpri) माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजनामा दिला असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल येत्या दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसापासून भारतीय जनता पक्षात अस्वस्थ असलेले एकनाथ पवार यांनी आज राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनात पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि प्रवक्ते पदाचा राजनामा देत असल्याचे जाहीर केले.

Gaafil Movie : ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च

मोरवाडी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषेदेत त्यांनी पत्रकारांची (Pimpri)संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड सारख्या वाळवंटात मागील 40 वर्षात मी भारतीय जनता पक्षाचे निष्ठेने काम केले. शहरात भारतीय जनता पक्षवाढीमध्ये माझाही सिंहाचा वाट आहे. भारतीय जनात पक्ष राज्यात आणि देशात सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण देण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे सत्तेचा मोह न ठेवता समाजासाठी पदाचा राजनामा देत असल्याचे जाहीर केले.

मराठवाड्यातील मराठा समाजाची अत्यंत दयनीय स्थिती आहे. त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. केंद्रात आणि राज्यात मंत्री असलेले नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत आहेत. मराठा आणि कुणबी अशी फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतली नाही. राज्यात मराठा समाजाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही असेही ते म्हणाले.

राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण

या राजनाम्यानंतर एकनाथ पवार हे येत्या काही दिवसात मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातून 2014 मध्ये भोसरी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी 52 हजार मते मिळवली होती. तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते म्हणून पदे सांभाळली आहेत. शिवाय, पवार हे भोसरी अथवा मराठवाड्यातून विधानसभा निवडणूक 2024 लढविण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.