Wakad : नखे खायला घालून पतीवर अघोरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न; पत्नीसह सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पतीला नखे खायला घालून तसेच पतीवर जादूटोण्याचे प्रयोग (Wakad) केले. हा प्रकार पतीने सासू, सासऱ्यांना सांगितला असता सासू, सासरे आणि अन्य नातेवाईकांनी पतीला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) तापकीर चौक, काळेवाडी येथे घडला.

योगेश शिवाजी आपुणे (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी (Wakad) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे गोपाळ लिंबराव शिंदे (वय 55), सासू (वय 50), मेहुणा अनिल गोपाळ शिंदे (वय 25), अक्षय गोपाळ शिंदे (वय 23), शिवाजी राऊत (वय 34, रा. लोणी काळभोर), महिला (वय 30), योगेश यांची पत्नी (वय 27, रा. काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते एकनाथ पवार यांचा राजीनामा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश यांचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यानंतर पत्नीने मोहोळ येथील बाबाजी शेख याच्याशी फोनवर बोलून जादूटोणा करण्याबाबत विचारपूस केली. फिर्यादीला जेवणात नखे आणि इतर काही वस्तू खायला देण्याबाबत चर्चा झाल्याचे कॉल रेकॉर्डिंग फिर्यादींनी पत्नीच्या मोबाईल मध्ये ऐकले. त्याबाबत त्यांनी सासू सासरे यांना सांगितले. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादीस नखे खाऊ घालणे, मायाजाळ नावाची वस्तू व इतर वस्तू पाण्यात मिसळून खायला देण्याचे प्रकारे केले.

सासरे गोपाळ शिंदे यांनी यांनी फिर्यादीस घरी येऊन त्यांना मारहाण केली. महुण्याने फिर्यादीस कोयत्याने मारहाण केली. सासूने फिर्यादीच्या डोक्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस, ‘तू जिथे दिसशील तिथे तुला आम्ही जीवे मारू’ अशी धमकी दिली. पत्नीने फिर्यादीला ‘जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मेहुणा अनिल शिंदे याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.