PCMC News : क्रीडानगरी म्हणून शहराचा नावलौकिक व्हावा – जितेंद्र वाघ

एमपीसी न्यूज – “क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना देखील राजाश्रय मिळायला लागला आहे. उद्योगनगरी बरोबरच भविष्यात क्रीडानगरी म्हणून पिंपरीचिंचवड शहराचे नावलौकिक व्हावा,(PCMC News) अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी व्यक्त केली.

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 नियोजन व आयोजन सभा-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि.4) रोजी पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात क्रीडा शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वाघ बोलत होते.

यावेळी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, उपायुक्त विठ्ठल जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा कार्यालय क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, (PCMC News) श्रीकांत हरनाळे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्यासह सभेसाठी शहरातील 400 शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलाने झाली.

MPC News Podcast 5 October 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिका ही क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नियोजन व्यवस्थितरित्या करून शहराच्या नावलौकिकात भर टाकण्याचे काम पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे”.

पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर म्हणाले, “खेळाडूंनी केवळ गुणांसाठी खेळ न खेळता आपले क्रीडा गुण ओळखून क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणे आवश्‍यक आहे”.(PCMC News) जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच संबंधीत योजनांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा पर्यवेक्षिका जयश्री साळवे यांनी केले. तर, सुभाष पवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.