Pimpri Corona Update : शहरात आज नवीन 2 हजार 261 रुग्णांची नोंद; 5 हजार 181 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 261 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली त्यामुळे किंचित्सा दिलासा मिळाला. तर, कोरोनामुक्त झालेल्या 5 हजार 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीमधील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 554 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 42 हजार 208 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 23 हजार 948 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 23 हजार 444 रुग्ण गृहविलगीकरणात असून 504 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 47 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 950 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 986 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 32 लाख 58 हजार 760 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.