Gutkha Seized: पिंपरी-चिंचवड शहरात 24 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज: निगडी आणि हिंजवडी परिसरात स्थानिक पोलिसांनी गुटखा विक्री प्रकरणी दोन कारवाया केल्या.(Gutkha Seized) दोन्ही कारवायांमध्ये 24 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.

 

पोलीस हवालदार सतीश ढोले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी गुरुवारी (दि. 4) दुपारी फ क्षेत्रीय कार्यालयासमोर प्राधिकरण येथे कारवाई केली. विशाल नामदेव रिठे (वय 30, रा. ओतस्किम, निगडी), राहुल नारायण हुलसुरे (वय 30, रा. रूपीनगर, तळवडे) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 13 हजार 140 रुपयांचा गुटखा आणि 40 हजार रुपयांची दुचाकी जप्त केली. (Gutkha Seized) आरोपी राहुल याने विशाल याला गुटखा विक्रीसाठी पुरवला. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Congress Protest: पिंपरीत काँग्रेसचे महागाई आणि बेरोजगारीविरोधात जेलभरो आंदोलन

तर दुसरया कारवाईत पोलीस शिपाई अमित जगताप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील ऋषभ पान शॉपवर गुरुवारी दुपारी छापा मारून कारवाई केली. त्यात 11 हजार 188 रुपयांचा गुटखा जप्त केला. (Gutkha Seized) विनयकुमार अवधनारायण सिंग (वय 34, रा. मारुंजी, ता. मुळशी) आणि रामदेव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयकुमार याला अटक केली आहे. रामदेव याने विनयकुमार याला विक्रीसाठी गुटखा पुरवला. या घटनेचा हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.