Pimpri : देशाला हुकुमशाही पासून रोखण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी होणे आवश्यक – रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज – जातीयवादी आणि धार्मिक तेढ वाढवण्याचा (Pimpri) प्रयत्न करणाऱ्या शक्तीला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी काँग्रेसची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच विचारवंतांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या ‘आप’ मधून सुजाण युवक काँग्रेस पक्षात प्रवेश करतो आहे. देशाला हुकुमशाही पासून रोखण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीच्या धर्माचा मान, सन्मान राखणे हा आमचा धर्म आहे. हिंदू, मुस्लिम या देशात एकजुटीने राहत आहेत. आजचा युवक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये येत आहे. ‘आप’ मधून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्यांचे मी स्वागत करतो असे प्रतिपादन कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.

बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम आदमी (‘आप’) पक्षाचे माजी शहर अध्यक्ष अनुप शर्मा, उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा माजी अध्यक्ष वहाब शेख तसेच विष्णु पाटील, दिपक श्रीवास्तव, सतिश नायर, सिमा यादव, मेमुना शेख, सद्दाम पठाण, रवी कृष्ण मोरे, जावेद शेख, भैय्यासाहेब कांबळे, गणेश कांबळे, मुकेश जाधव, अजय गायकवाड, फिलिप मकासरे, रामसिंग यादव आदींचा शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागत आ. धंगेकर आणि पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

Pune : पुण्यात चार दिवसीय एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनचे आयोजन

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष शामला सोनवणे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगता,प माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी काँगेस शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, काँग्रेसमध्ये (Pimpri) कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. याचे उदाहरण कार्यसम्राट आमदार रवींद्र धंगेकर आहेत. गेली 65 वर्षे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन देशाचा विकास करीत, न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. परंतु देशाच्या विकासाचा कोणताही अजेंडा भाजपा पुढे नाही. आता पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर करायचा आहे, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काँग्रेसची संघटना बांधण्याचे काम करीत आहे. सूत्रसंचालन विश्वनाथ जगताप यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.