Pimpri: मोहननगरमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात

नगरसेविका मीनल यादव यांच्या पुढाकाराने कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या पुढाकाराने मोहननगरमध्ये सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सुमारे 14.85 कोटीचे हे काम आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे आज (बुधवारी) भूमीपूजन करण्यात आले.

उपमहापौर तुषार हिंगे , ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेवक राजू मिसाळ, प्रमोद कुटे, जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता, माजी नगरसेवक प्रकाश बाबर, संजय जगताप, प्रतिभा लोखंडे, गणेश लंगोटे, किरण देशमुख, राहुल दातीर पाटील, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव आदी उपस्थित होते.

या प्रकल्पादरम्यान मोहननगर छत्रपती शिवाजी महाराज कमान ते मेहता हॉस्पिटल या पूर्ण रस्त्यामध्ये ड्रेनेजच्या लाईन, स्ट्रॉम वॉटर म्हणजे गटार लाईन, पाण्याची लाईन, लाईटच्या पोलच्या वायरिंग तसेच यापुढे होणाऱ्या वायरसाठी वेगळी लाईन व चेंबर करण्यात आले आहे. त्यानंतर संपूर्ण काँक्रिटीकरण, सिमेंटचा रस्ता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.