Pimpri : कंत्राटी मजदूर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली केन्द्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांची भेट

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय कंत्राटी मजदूर महासंघाच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी कंत्राटी महासंघाचे प्रभारी वीरेंद्रकुमार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. २) नवी दिल्ली येथे केन्द्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांची भेट घेतली.

यावेळी देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. त्यांच्या समवेत राष्ट्रीय अध्यक्ष के.बी.राधाकृष्ण, राष्ट्रीय महामंत्री बृजबिहारी शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मांडवकर, राष्ट्रीय मंत्री सुशील पटेल, नानकचंद ठाकुर, सचिन मेंगाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष देवेन्द्र कौशिक आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.